प्रजासत्ताक दिनी तहसीलदारांच्या हस्ते विशेष उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार
उरण (विठ्ठल ममताबादे ) :26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन देशभर साजरा केला गेला .तसेच रायगड जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला गेला. कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर व पनवेल प्रांत राहुल मुंडके आणि आदिवासी विकास प्रकल्प पेण अहिराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी उत्थान कार्यक्रमांतर्गत जे आदिवासींचे महत्त्वाचे कागदपत्र बनवण्याचे कार्यक्रम गेल्या वर्षभरात जिल्हाभर चालू असलेल्या कार्यक्रमांमध्ये उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांचे जातीचे दाखले,रेशन कार्ड असे विविध प्रकारचे कागदपत्रे बनवण्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर व त्यांचे सहकारी दत्ता गोंधळी,सुनील जोशी, मनीष कातकरी यांनी मोलाचे काम केल्याबद्दल उरण तालुक्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. नरेश पेडवी, रावसाहेब व धुमाळ पुरवठा अधिकारी व इतर कर्मचारी यांनी सुद्धा या कार्यात मोलाची साथ दिली आहे.तसेच या कार्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रा. राजेंद्र मढवी या सर्वांचे यावेळी आभार माणण्यात आले.