जगद्गुरू नारेंद्रार्यजी महाराज प्रशालेला क्रीडा स्पर्धेत ५ सुवर्णसह ५ रजत पदके
नाणीज :- येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चिपळूण येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये ५ सुवर्ण, ५ रजत व ४ कांस्य पदके जिंकून प्रशाळेचे नाव उज्वल केले. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे व प्रशालेचे कौतुक होत आहे.
कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब जुनिअर ऍथलेटीक्स स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनच्यावतीने ८ फेब्रुवारी २०२३ रोजी रत्नागिरी जिल्हा सब जुनिअर अॅथलेटीक्स अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धा ८ वर्षे, १० वर्षे आणि १२ वर्षाखालील मुले व मुली अशा तीन गटांत झाल्या. ही स्पर्धा डेरवण क्रीडासंकुल, चिपळूण येथे झाली.
या स्पर्धेमधील गुणवंत असे: आठ वर्ष मुले: ८० मीटर धावणे -सार्थक संदेश काळे, पहिला (सुवर्ण पदक).
५० मीटर धावणे -पार्थ प्रशांत सावंत, दुसरा (रजत पदक).
आठ वर्ष मुली : ८० मीटर धावणे – स्वानंदी नागेश रसाळ, प्रथम (सुवर्ण पदक) व ५० मीटर धावणे, द्वितीय (रजत पदक)
दहा वर्ष मुली : ५० मीटर धावणे १) सौम्या विशाल सरफरे – पहिली (सुवर्ण पदक). तसेच 100 मीटर मध्येदेखील ती पहिली (सुवर्ण पदक). २) १०० मीटर धावणे- शुभ्रा विशाल सरफरे, दुसरी (रजत पदक) ३) निती नरेंद्र खाकम तिसरी (कास्य पदक).
दहा वर्ष मुले : ५० मीटर धावणे-
साईराज सोमनाथ चव्हाण तिसरा (कास्य पदक).-
लांब उडी: १) आयुष दशरथ मावळणकर, दुसरा (रजत पदक) २) योग गोकुळ परपते तिसरा (कास्य पदक).
बारा वर्षे मुली : लांब उडी
१) सिद्धी किशोर गावडे, प्रथम (सुवर्ण पदक). २) दिव्या सतीश भागवत तृतीय (कास्य पदक).
बारा वर्षे मुले : लांब उडी – अतुल चंद्रकांत नवले, दुसरा (रजत पदक)
या यशाबद्दल जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी मुलांचे अभिनंदन करत भरभरून आशीर्वाद दिले. प्रशालेतील मुलांना नेहमी प्रेरणा देणारे व प्रोत्साहनपर त्यांना अशा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवणारे क्रीडाशिक्षक श्री विशाल माने यांचे देखील संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. प्रशालेचे चेअरमन, व मुख्याध्यापिका अबोली पाटील तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.