रत्नागिरी अपडेट्स
रत्नागिरीत पोलिस परेड ग्राउंडवर २७ रोजी होणार राज्यगीत गायनाचा भव्य कार्यक्रम
रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 7 ते 8.30 वाजता या वेळेत पोलीस परेड ग्राऊंडवर हा कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.