महाराष्ट्र
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मालगुंड येथे उद्या कार्यक्रम
रत्नागिरी : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन दि.२७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता कवी केशवसूत स्मारक संकुल, मालगुंड ता.जि. रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये मराठी भाषेतील लोककला यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धात्मक स्वरुपात आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पोवाडे, भारुडे, गोंधळ, वासुदेव इत्यादी लोककलांचा समावेश करण्यात आला आहे.