आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत.पुरुषांच्या खांदयाला खांदा लावून पुरुषांच्या बरोबर काम करत आहेत. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. आपल्या आयुष्यात एक स्त्री बहिण,आई, पत्नी, काकी मावशी, मैत्रिण आदी भूमिका आपल्या आयुष्यात साकारत असते. अशीच समाजातील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व पैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे आनंदनगर उरण येथे राहणाऱ्या सौ.वैशाली घनश्याम कडू.
सौ. वैशाली घनश्याम कडू या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या साप्ताहिक प्रांजलच्या संपादिका आहेत . त्या एक उत्कृष्ठ महिला पत्रकार व आदर्श गृहिणी सुद्धा आहेत. टायपिंग करून पत्रकारिता करून कुटुंब उत्तमरित्या सांभाळण्याचे काम वैशालीलाई करत असून आजपर्यंत आपल्या पत्रकारितेतून बहुजन समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. अनेक समस्यांची सोडवणूक, त्यांनी आपल्या पत्रकारितेतून केली आहे. त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्य पाहून त्यांना अनेक विविध पुरस्कार देखील मिळाले आहेत. वैशालीताई यांचे जीवन सर्व महिलांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे.