रत्नागिरी अपडेट्स
रत्नागिरीतील ‘इस्कॉन’ मंदिरात उद्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : शहरातील एमआयडीसी भागातील ‘इस्कॉन’च्या मंदिरात उद्या दि. १२ मार्च २०२३ रोजी श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र यांचा ब्रह्मोत्सव आहे त्या निमित्त सकाळी ९.४५ ते १२.३० या वेळेत अभिषेक, ५६ भोग आणि गौर कथाकथन कार्यक्रम होणार आहे.
सर्व उपस्थितांसाठी पूर्ण प्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थीत राहणाऱ्या भक्तांनी भगवंताच्या आनंदासाठी भोग आणावेत, असे आवाहन इस्कॉन रत्नागिरी गृहस्थ भक्ती प्रचार समितीकडून करण्यात आले आहे.