महिला बचतगटांनी एकत्र येत साजरा केला जागतिक महिला दिन
उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील चिरले गावात विविध महिला बचत गटांनी एकत्र येत विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवून जागतिक महिला दिन साजरा केला. राधाकृष्ण बचत गट, सिध्दीविनायक बचत गट, नम: शिवाय बचत गट, ओम नमः शिवाय बचत गट,नवदुर्गा बचत गट, शिवाई बचत गट, जय मल्हार बचत गट, श्री गणेशकृपा बचत गट,वरदविनायक बचत गट, अष्टविनायक बचत गट, वैभवलक्ष्मी बचत गट,मंगलागौरी बचत गट,मातोश्री बचत गट, हिरकणी बचत गट, खंडोबा बचत गट,समर्थकृपा बचत गट या चिरले गावातील बचत गटांनी, बचत गटाच्या महिला पदाधिकारी सदस्यांनी एकत्र येत जागतिक महिला दिन साजरा केला.
शाहीर वैभव घरत यांच्या सुमधुर शाहिरीने कार्यक्रमाची सुरवात झाली.या वेळी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. एकंदरीत मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह महिला दिन साजरा झाला.
या प्रसंगी चिरले गावचे सरपंच सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते चैतन्य पाटील, समाधान माळी, अस्मिता पाटील , रंजना माधवी, विश्रांती घरत, रुपाली घरत, सुलक्षना पाटिल आदी मान्यवर उपस्थित होते.