कोकण नगर परिसरातील समस्यांकडे रत्नागिरी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष!
रमजानमध्ये पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची नौसीन काझी, मुन्नवर मुल्ला यांची मागणी
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्र.४मधील (कोकण नगर, कीर्तीनगर, क्रांतिनंतर, चर्मालय व परिसर) समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसंख्याक सेलचे जिल्हा महासचिव नौसीन काझी तसेच प्रभाग अध्यक्षा सौ. मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांनी थेट रत्नागिरी नगर पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन दिली.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये अंतर्गत रस्त्यांना महत्त्वाच्या बहुतेक ठिकाणी गतिरोधक नसल्याने दिवसेंदिवस येथील स्थानिक नागरिकांना अपघाताना सामोरे जावे लागत आहे. विषेता लहान मुलांना तसेच रोज अपार्टसमोरील मुख्य रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. या सर्व बाबींची दखल घेऊन या भागातील रस्त्यांवर गतिरोधक व स्ट्रीट लाईट लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नगर पालिका मुख्याधिकारी तुषार बाबर यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, या सर्व समस्यांची गंभीर दखल घेत श्री. बाबर यांनी लवकरात लवकर या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी आश्वासन श्री. काझी यांना दिले.
प्रभागातील स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. नौसीन काझी आणि सौ. मुन्नवर-सुलताना फरहान मुल्ला यांनी प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.