मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटातील वाहतूक उद्यापासून दिवसातले ६ तास बंद!
रत्नागिरी : मुंबई व राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण शहरालगतच्या परशुराम घाटात चौपदरीकरणा अंतर्गत सुरू असलेले काम युद्धपातळीवर उरकून पावसाळ्यात हा घाट पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा, यासाठी दि. २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ या कालावधी आठवडाभर महामार्गावरील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. या नुसार दिनांक 27 मार्च ते दिनांक 3 एप्रिल 2023 म्हणजे संपूर्ण आठवडाभर दुपारी 12 ते सायंकाळी सहा या वेळेत परशुराम घाटातून होणारी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत महामार्गावरील हलक्या वाहनांचे वाहतूक आंबडस चिरणी मार्गे लोटे अशी वळवण्यात येणार आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी हा घाट पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी उपलब्ध व्हावा, यासाठी हे नियोजन हाती घेण्यात आले आहे.