कोकण रेल्वे मार्गावर ८ एप्रिलला धावणार वन-वे सुपरफास्ट ट्रेन!
रत्नागिरी : मंगळुरू ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अशी वन-वे सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सोडण्यात येणार आहे. कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, रोहा मार्गे ही गाडी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्रमांक ०६००७ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) वन वे सुपरफास्ट स्पेशल मंगळुरू जंक्शन येथून 08/04/2023, शनिवार रोजी 18:10 वाजता सुटणार असून ती ट लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
ही सुपरफास्ट गाडी सुरतकल, उडुपी, कुंदापुरा, मुकांबिका रोड बैदूर, भटकळ, मुर्डेश्वर, कुमटा, कारवार, काणकोण, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल आणि ठाणे स्टेशन हे थांबे घेत मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनसला विसरणार आहे.
ही गाडी एकूण 19 कोचसह धावणार आहे. टू टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 09 डबे, SLR – 02. अशा डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.