पाच राज्यांमध्ये महारक्तदान शिबिर ; एकाच दिवशी ९० ठिकाणी रक्तदान!
रत्नागिरी जिल्ह्यात सहा ठिकाणी रक्तदान
रत्नागिरी : ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’, अनिरुद्ध समर्पण पथक’ या संस्थांनी आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. अनिरुद्ध जोशी, एमडी मेडिसिन (सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या संस्थांनी रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात एकूण १५२६१ युनिट्स इतके रक्त संकलित करण्यात आले. याचा १०० हून जास्त ब्लड बँकांनी लाभ घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ६ ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल ३२६ इतके युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ४ ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल ९६ इतके युनिट्स रक्त संकलित करण्यात आले.
एप्रिल व मे महिन्यात रक्तपेढ्यांना रक्ताचा मोठा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या काळात आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिराचा आपल्याला फार मोठा लाभ झाल्याचे ब्लड बँकांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. विशेषतः या वर्षी मुंबईसह महाराष्ट्राच्या रक्तपेढ्यांमध्ये अपेक्षेहूनही फारच कमी युनिट्स शिल्लक रहिले होते. अशा परिस्थितीत महारक्तदान शिबिरामुळे फार मोठा दिलासा मिळल्याचे या ब्लड बँकांकडून सांगण्यात आले.