‘हुहतामाकी’ मधील कामगारांना रुपये ७५०० रुपयांची वेतनवाढ!
न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेचा पगारवाढीचा सपाटा कायम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगार नेते महेंद्र घरत यांच्या न्यू मॅरिटाईम ऍण्ड जनरल कामगार संघटनेकडे कामगारांचा ओघ वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे संघटना करत असलेली कामगारांची पगारवाढ. दरवर्षी किमान रुपये ६०००/- ते २५०००/- पर्यंत पगारवाढ करून कामगारांना सक्षम बनविनारी कामगार नेते महेंद्र घरत यांची NMGKS एकमेव संघटना ठरली आहे.
मध्यमवर्गीय कामगारांच्या अपेक्षा माफक असतात. त्यांना राहायला घर, मुलांचे शिक्षण व आपल्या आई वडिलांचा औषधोपचार करता यावेत यासाठी सगळा आटापीटा असतो. संघटना कामगारांना सक्षम बनविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असते हेच संघटनेच्या यशाचे गमक आहे. आज रायगड, नवी मुंबई मध्ये कामगार नेते महेंद्र घरत यांचे दरवर्षी १५ ते २० नवीन कंपन्यातील कामगार नेतृत्व स्विकारत असतात. संघटनेचे अध्यक्ष कामगार, राजकीय व सामाजिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी असले तरी कामगारांना कोणतेही व्यत्यय येवू नये म्हणून आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना करारनामे तसेच निर्णय घेण्याचे अधिकार देतात जेणेकरून कामगारांचे कोणतेही काम थांबू नये.त्यामुळे कामगार क्षेत्रात NMGKS ही विश्वसनीय कामगार संघटना म्हणून प्रसिद्ध आहे. दिनांक १० मे २०२३ रोजी तळोजा येथील मे. हुहतामाकी इंडिया लि. या कंपनीतील कामगारांसाठी ३ वर्षासाठी ७५०० /-रू. पगारवाढ, ३१ हजार ते ३५ हजार दिवाळी बोनस, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी व इतर सोई सुविधा देण्याचा करार करण्यात आला. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के.रमण, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे मॅन्युफॅक्चरींग हेड धनपाल जैन, एच. आर.मॅनेजर निलायन दास, प्लेटिंग मॅनेजर सचिन चव्हाण, सिनियर एच. आर.मॅनेजर अमोल शेळके तर कामगार प्रतिनिधी बाळाराम दारावकर, तुकाराम निघुकर, निवृत्ती निघुकर,विजय अल्हटआदी उपस्थित होते.या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण आहे.