कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पॉझिटिव्ह ‘सिग्नल’
उद्याची वंदे भारत एक्सप्रेसची पहिली फेरी हाऊसफुल्ल ; वेटिंग लिस्टवर तिकीट विक्री सुरू
रत्नागिरी : आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात कोकण रेल्वे मार्गावर आज शुभारंभ झालेली मुंबई सीएसएमटी -मडगाव (२२२२९) वंदे भारत एक्सप्रेस हाऊसफुल्ल झाली आहे. बुधवारच्या पहिल्या फेरीची सर्व तिकिटे आरक्षित झाल्याने आता या गाडीसाठी प्रतीक्षा यादीवरील बुकिंग सुरू झाले आहे. दरम्यान, वंदे भारत से आरक्षण काल 26 जून रोजी खुले झाल्यानंतर आज दोन दिवसानंतर येत्या गणेशोत्सवातील वंदे भारत एक्सप्रेसच्या पाच दिवसांच्या फेऱ्या हाउसफुल्ल झाले आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या आणि महाराष्ट्रातील पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या गाडीची पहिली कमर्शियल फेरी दिनांक 28 जून 2023 रोजी होत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसच्या या पहिल्या फेरीची सर्वच्या सर्व तिकिटे आरक्षण खुले झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात संपली आहेत. यामुळे या गाडीसाठी आता वेटिंग लिस्ट वरील बुकिंग सुरू आहे.
कोकण मार्गावरील वंदे भारतला पॉझिटिव्ह ‘सिग्नल’
मेक इन इंडिया अंतर्गत बनवण्यात आलेली हायटेक वनडे भारत एक्सप्रेसचे तिकीट विमानापेक्षा महाग असल्याची ओरड एकीकडे होत असतानाच प्रत्यक्षात अवघ्या दोन दिवसात संपूर्ण गाडी आरक्षित झाल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेससाठी हाय पॉझिटिव्ह सिग्नल मानला जात आहे