गणेशोत्सवात दिवा-चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल ट्रेनच्या ३६ फेऱ्या जाहीर
रत्नागिरी : मध्य रेल्वेने यापूर्वीच गणपती उत्सवासाठी 156 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत. या पाठोपाठ आता मध्य रेल्वेने गणपती उत्सवासाठी आणखी 52 ट्रेन सेवांची घोषणा केली, यामुळे येत्या गणेशोत्सवात आतापर्यंत एकूण एकूण 208 विशेषकर यांचे नियोजन रेल्वेने केले आहे. यामध्ये दिवा ते चिपळूण दरम्यान धावणाऱ्या मेमू स्पेशल गाडीचा देखील समावेश आहे.
नव्याने प्राप्त झालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे 52 गणपती स्पेशल ट्रेन चालवणार आहे – 36 मेमू स्पेशल दिवा-चिपळूण दरम्यान आणि 16 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरू जंक्शन दरम्यान गणपती उत्सव 2023 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे:-
अ) दिवा-चिपळूण मेमू विशेष सेवा -३६ फेऱ्या
01155 मेमू दिवा येथून 13.09.2023 ते 19.09.2023 आणि 22.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज 19.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी 01.25 वाजता चिपळूणला पोहोचेल.
01156 मेमू चिपळूण येथून 14.09.2023 ते 20.09.2023 आणि 23.09.2023 ते 03.10.2023 पर्यंत दररोज 13.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.00 वाजता दिवा येथे पोहोचेल.
रचना: 8 मेमू कोच
थांबे : पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.
ब) मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – 16 फेऱ्या
01165 स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15.09.2023, 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 22.09.2023, 23.09.2023, 23.09.2023, आणि 23.09.2023 -22.15 वाजता सुटेल आणि मंगळुरु जंक्शन 17.20 वाजता दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
01166 स्पेशल मंगळुरु जंक्शन 16.09.2023, 17.09.2023, 18.09.2023, 19.09.2023, 23.09.2023, 24.09.2023,30.09.2023 आणि 01.10.2023 ला 13.35 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा , मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल.
रचना: 1 AC-2 टियर, 2 AC-3 टियर, 10 स्लीपर क्लास, 5 जनरल सेकंड क्लास आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्डची ब्रेक व्हॅन.
गाडी क्र. 01165 03.07.2023 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध होईल. याचबरोबर www.irctc.co.in या वेबसाइटवर आरक्षण करता येईल.