कबड्डी दिनानिमित्त देवरुखात १५ जुलैला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा
देवरूखच्या नाद कबड्डी गृपचा पुढाकार
देवरूख (सुरेश सप्रे) : लाल मातीतल्या कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारे कोकणचे सुपुत्र कबड्डी महर्षी बूवा साळवी यांचे स्मरणार्थ १५ जुलै हा दिवस कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. या कबड्डी दिनानिमित्त संगमेश्वर तालुक्यातील देवरूखमधील नाद गृपच्या वतीने १५ जूलै रोजी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करणेत आल्या आहेत.
या स्पर्धा मिनाताई ठाकरे क्रीडा संकुल साडवली येथे संपन्न होणार असून जुन्या जाणत्या ज्येष्ठ कबड्डी खेळाडूंच्या हस्ते स्पर्धेचे (साय. ५ वाजता) उद्घाटन होणार आहे.
यावेळी ज्यांनी तालुक्यात कबड्डी रुजवली आणि वाढवली असे जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, कबड्डी प्रेमी, क्रीडा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, पंच आणि वर्षानुवर्षे कबड्डी स्पर्धा घेत आहेत, अशी मंडळे यांचा सन्मान केला जाणार आहे.
नाद कबड्डी ग्रुपचे कौस्तूभ जाधव, प्रतीक किर्वे, गणेश कांगणे आदी सदस्य मेहनत घेत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस चे रत्नागिरी स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले त्या प्रसंगी.