एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे मुंबई विद्यापीठाचा वर्धापन दिन साजरा
- पावस वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूची देणगी
- माने विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे मंगळवार दि. १८ जुलै रोजी पावस येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. शिवाय मिरजोळे येथील यशवंत माने प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन गौरविण्यात आले.
मंगळवारी सकाळी यशवंत माने प्राथमिक विद्यालयात झालेल्या शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करताना शिक्षक दीपक घवाळी, किरण कांबळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील साळवी आणि स्वयंसेवक होते. तर मंगळवारी दुपारी पावस येथील अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
यावेळी अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रम पावस येथील संपर्क अधिकारी चेतना खातू पर्यवेक्षक श्रीमती कदम, प्रा. सुशील साळवी, प्रा. योगेश हळदवणेकर स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमांना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले.