महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर!
रत्नागिरी दि. ११ (जिमा: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार 12 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.48 वाजता खेड, (जि. रत्नागिरी) रेल्वे स्टेशनवर आगमन व मोटारीने दापोलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह, दापोली येथे आगमन व राखीव . दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह दापोली येथे महिला व बाल विकास विभाग यांच्या सोबत बालविवाह, महिला अत्याचार, महिला सक्षमीकरण इ. विषयांवर बैठक. सायंकाळी5.30 वाजता मोटारीने खेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता खेड रेल्वे स्टेशनवर आगमन. सायंकाळी 6.45 वाजता वंदे भारत एक्सप्रेसने पनवेल, जि. रायगडकडे प्रयाण.