ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या पोरबंदर-कोचुवेली एक्सप्रेसला जादा डबा
गणेशोत्सवातील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचा निर्णय
रत्नागिरी : सणासुदीच्या दिवसात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन गुजरातमधील पोरबंदर ते दक्षिणेतील कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसला अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पोरबंदर ते कोचुवेली (20910) या गाडीला दि. 20 सप्टेंबर 2023 रोजीच्या फेरीसाठी तर कोचुवेली ते पोरबंदर या मार्गावर धावताना (20909) दि. 24 सप्टेंबर 2023 च्या फेरीसाठी स्लीपर श्रेणीचा एक डबा जादा जोडला जाणार आहे.
गणेशोत्सव कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वेने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.