देवरुख’ येथे सर्वांसाठी डोळ्याच्या पडद्याची अंतर्गत तपासणी

रत्नागिरी : देवरुख येथे रविवार दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी स. १० ते दु. ३ वाजेपर्यंत सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. प्रसाद कामत नेत्र तपासणीसाठी येणार आहेत. डॉ. प्रसाद कामत हे शंकर नेत्रालय चेन्नई येथून विशेष प्रशिक्षित रेटीना स्पेशालिस्ट असून डोळ्याच्या पडद्यांशी संबंधित आजारांचे एक लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत तसेच २५००० हून अधिक डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या व अवघड शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत.
ज्यांना मधुमेह आहे किंवा ज्यांचे वय ४० वर्षाहून अधिक आहे त्यांना नकळत खालील समस्या उद्भवू शकतात.
१) मोतिबिंदू असणे.
२) डोळ्यातील प्रेशर वाढणे.
३) अचानक नजर कमी होणे.
४) पडद्याला सूज येणे व छिद्र पडणे.
५) पडदा सरकणे.
६) डायबेटिसमुळे दृष्टी कमी होणे.
देवरुख सारख्या ठिकाणी सुपर स्पेशालिस्ट रेटीना नेत्रतज्ञ उपलब्ध नसल्याने दि. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी डॉ. प्रसाद कामत यांच्याद्वारे नेत्र तपासणी ‘श्री. विठ्ठल मंदिर’ येथे करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या दिवशी सवलतीच्या दरात सर्व तपासण्या करण्यात येतील. डोळ्याच्या सविस्तर तपासणीसाठी व पडद्याची पाहणी करण्यासाठी थोडा वेळ लागत असल्याने पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.
या तपासणीसाठी साधारणतः ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे पूर्व नोंदणी आवश्यक.
कॉन्टॅक्ट नं :- 93727 66504
रविवार, १५ ऑक्टोबर २०२३
वेळ :- सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० पर्यंत.
शिबिराचे स्थळ :- श्री. विठ्ठल मंदिर, देवरुख, मधली आळी.
नोंदणी व तपासणी फी :- फक्त ₹१००/-
हॉस्पिटलचा पत्ता :- शांतादुर्गा संकुल, साळवी स्टॉप, रत्नागिरी ४१५६१२.