ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रलोकल न्यूज

मुंबई -गोवा मार्गावर चरवेली येथे
गॅस टँकर उलटून वायूगळती

विस्कळीत झालेली वाहतूक सात तासांनी सुरू

नाणीज, दि. ८: मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा नजीक असलेल्या चरवेली येथील वळणावर गॅसचा टँकर उलटून वाहतूक गळती सुरू झाली. काल रात्री ११.३० वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. पोलिसांनी तातडीने महामार्गावरील वाहतूक बंद केली. पूर्ण धोका टाळल्यावर आज सात तासांनी वाहतूक सुरू करण्यात आली.

अपघातातील गॅस टँकर न. यू.पी.-७० सीटी ९९९९ हा वळणावर डाव्या बाजूला उलटला. लोकांनी तातडीने त्या टँकरचा चालक बिरपाल प्रेमणारायण सिंग (वय ५७, रा. उत्तरप्रदेश) बाहेर काढले. त्यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी आली होती. त्यातून चालकाला पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या टँकर मधून गॅस गळती होत होती. त्यामुळे लागलीच अग्निशामक दल एमआयडीसी व रत्नागिरी नगर परिषद यांना फोन करून बोलावले. तसेच जिंदाल कंपनीचा टँकर असल्याने त्यांना कळवले.
रात्री साडेअकरा वाजता अपघात झाला होता. तातडीने महामार्गावरील वाहतूक थांबवली. ती पालीजवळील बावनदीमार्गे वळवण्यात आली. जिंदाल कंपनीचे तंत्रज्ञही तातडीने घटनास्थळी आले व त्यांनी गळती बंद केली. त्यानंतर सकाळी ६.२५ ला सुमारे सात तासाने महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
हातखंबा महामार्गाचे पोलीस, पाली दूरक्षेत्राचे पोलीस, तसेच रत्नागिरी येथील ग्रामीण पोलीस रात्रभर घटनास्थळी होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button