महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

देवरुख नगर पंचायत स्थापना दिन विविध कार्यक्रमास उत्साहात साजरा

देवरूख (सुरेश सप्रे ) : देवरुख नगर पंचायतीच्या स्थापनेला ११ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त नगर पंचायतीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन नगर पंचायत कार्यालयात करण्यात आले.


नगरपंचायत प्रशासन व लायन्स क्लब देवरुख यांच्या संयुक्त विदयमाने इको फ्रेंडली/ पर्यावरणपुरक गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नगरपंचायतीत लायन्स क्लब देवरुखचे अध्यक्ष लायन चेतन पाडळकर, लायन्स क्लबचे खजिनदार लायन अभिषेक अग्रवाल व नगरपंचायत देवरुखचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मातृमंदीर गोकुळ मुलींचे बालगृह यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांक सुशील सुभाष पर्शराम, देवरुख पर्शरामवाडी, तृतीय क्रमांक विभागून देणेत आला. तृतीय क्रमांक सुनील कृष्णा करंबेळे, गुरुकुल नगर देवरुख व श्रीराम गुणाजी बोटके, बोटकेवाडी देवरुख यांनी पटकावला. त्याचबरोबर उत्तेजनार्थ . सचिन दत्ताराम मोरे, वरची आळी देवरुख यांना पारितोषिेक देण्यात आले. या स्पर्धेच्या पारितोषिकाचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक या स्वरुपात देणेत आले. या प्रसंगी वसुंधरेचे जतन करणे ही काळाची गरज ओळखून त्यानुसार आपले सर्व सण समारंभ साजरे करणेकरीता सर्वांनी सदैव तत्पर असाव असे आवाहन नगरपंचायत देवरुख प्रशासनाच्या वतीने सर्वांना करण्यात आले.


या प्रसंगी लायन्स क्लब देवरुखचे अध्यक्ष लायन चेतन पाडळकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले व अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये लायन्स क्लब सदैव देवरुख नगरपंचायतीचे समवेत सहभागी असेल असे आश्वासन दिले.


नगरपंचायत स्थापना दिनानिमित्त सायंकाळी नगरपंचायत कार्यालयामध्ये श्रीसत्यनारायण प्रासादिक बालमित्रसमाज खालची आळी देवरुख यांचे भजन पार पडले. तर रात्रौ नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांचा विविध गुणप्रदर्शन कार्यक्रम पार पाडला. सर्वच कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडले, या स्थापनादिनानिमित्त माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, नागरीक, शासकीय अधिकारी, बँक अधिकारी, पत्रकार. कर्मचारी, बचत गटातील महिला सर्वांची उपस्थिती होती. यासंपुर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये नगरपंचायतीच्या कार्यालयीन कामकाजात कुठेही अडथळा वा खंड पडला नाही, ही बाब ठळकपणे दिसून आली.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button