राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उद्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी, दि.१४ : उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
रविवार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता जुहू येथून हेलिकॉप्टरने पालीकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता पाली, ता. जि. रत्नागिरी येथे आगमन व राखीव. दुपारी 1.45 वाजता पाली येथून हेलिकॉप्टरने जिंदाल पोर्ट हेलिपॅड (जय विनायक मंदिर जवळ) जयगडकडे प्रयाण. दुपारी 2 वाजता हेलिकॉप्टरने जिंदाल पोर्ट हेलिपॅड (जय विनायक मंदिर जवळ) जयगड, जि. रत्नागिरी येथे आगमन व मोटारीने खंडाळा, जि. रत्नागिरीकडे प्रयाण.
दुपारी 2.15 वाजता प्रसाद ऊर्फ बाबू पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन (स्थळ : खंडाळा, ता. जि. रत्नागिरी). दुपारी 3 वाजता नवतरुण मंडळ, जयगड आयोजित नवरात्रौत्सव २०२३ येथे भेट व दर्शन. (स्थळ : नवतरुण मंडळ, जयगड (बाजारपेठ), जि. रत्नागिरी) दुपारी 3.30 वाजता जिंदाल पोर्ट हेलिपॅड ( जय विनायक मंदिर जवळ) जयगड, जि. रत्नागिरी येथे आगमन व हेलिकॉप्टरने ओरोस, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.