ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

कोकण रेल्वे मार्गावर २२ डिसेंबरपासून हिवाळी स्पेशल गाड्या धावणार!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस तसेच हिवाळी पर्यटन हंगामासाठी तीन विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते थिवी, पुणे करमाळी तसेच पनवेल ते करमाळी या मार्गांवर या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

  • १) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी – थिविम – मुंबई सीएसएमटी विशेष (दैनिक)

या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्र. 01151 मुंबई CSMT – थिविम स्पेशल म्हणून रोज धावणार आहे 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत ही गाडी धावणार आहे. मुंबई CSMT येथून दररोज 00.20 वाजता हि गाडी सुटे आणि त्याच दिवशी 14.00 वाजता थिविमला पोहोचेल.

गाडी क्र. 01152 थिविम – मुंबई सीएसएमटी स्पेशल (दैनिक) गाडी असेल. थिविम येथून हि गाडी 22/12/2023 ते 02/01/2024 पर्यंत दररोज 15.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि पेडणे स्थानकांवर थांबेल.

ही गाडी एकूण 22 डब्यांची असेल. त्यात दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 03 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 05 डबे, एसएलआर – 02 अशी रचना असेल.

  • २) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. – करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक)

गाडी क्र. ०१४४५ पुणे जं. – करमाळी विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन शुक्रवार, 22/12/2023 आणि 29/12/2023 रोजी 17:30 वाजता सुटून ट दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०१४४६ करमाळी – पुणे जं. विशेष (साप्ताहिक) रविवार, 24/12/2023 आणि 31/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि पुणे जंक्शनला त्याच दिवशी 23:35 वाजता पोचेल.

ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबणार आहे.

रचना: एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.

  • 3) गाडी क्र. ०१४४८ / ०१४४७ करमाळी – पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक)

गाडी क्र. 01448 करमाळी – पनवेल विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी करमाळी येथून 09:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 20:15 वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्र. 01447 पनवेल – करमाळी विशेष (साप्ताहिक) शनिवार, 23/12/2023 आणि 30/12/2023 रोजी पनवेल येथून 22:00 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता करमाळीला पोहोचेल.

ही गाडी थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा स्थानकावर थांबेल.

रचना: एकूण 22 कोच = दोन टायर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 04 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 04 कोच, SLR – 02.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button