उरण नगर पालिका क्षेत्रात स्वच्छता अभियाना अंतर्गत साफसफाई

उरण दि २५(विठ्ठल ममताबादे ) : मागील महिन्या प्रमाणे दि. २४ नोव्हेंबर २०२३ रोजी उरण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात उरण शहरातील तहसील कार्यालय परिसर ते मशीद मोहल्ला ते महात्मा गांधी पुतळा ते हरीपांडवपथ पर्यंत परिसरात स्वछता अभियान घेण्यात आले. सदर अभियानात एकूण ३ टन कचरा उचलण्यात आला.
या अभियानात उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, लेखापाल सुरेश पोसतांडेल, बांधकाम अभियंता झुंबर माने, आरोग्य निरीक्षक हरेश तेजी, प्रशासकीय अधिकारी अनिल जगधानी, कर निरीक्षक संजय डापसे, तसेच उरण नगर परिषदेचे सफाई कर्मचारी / मुकादम यांचे श्रमदानातून स्वछता अभियान पार पडले. तसेच उरण नगर परिषद शाळा क्र १,२,३ चे शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी या अभियानात भाग घेऊन श्रमदान केले.
या अभियानामुळे उरण नगर परिषद हद्दीतील परिसर स्वच्छ व सुंदर झाले. शहर स्वच्छ व सुंदर झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या अभियानाचे कौतुक करत नागरिकांनी नगर परिषदेचे आभार मानले.