चिपळुणात १० डिसेंबरला सत्संग सोहळ्याचे आयोजन
संगमेश्वर : सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने प. आ. मोहन गुंडुजी (संयोजक, मुखी, ब्रम्हज्ञान प्रचारक – मुंबई ) यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. १० डिसेंबर २०२३) रोजी सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सत्संग सोहळ्याला चिपळूण व रायगडचे झोनल इंचार्ज प. पू. प्रकाश म्हात्रेजी विशेष उपस्थित राहणार आहेत. हा सत्संग सोहळा चिपळूणमधील जे. के. इंडस्ट्रीज प्लॉट नंबर डी-३ गाणे-खडपोली MIDC याठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता सुरू होणार आहे. मुंबईतील संयोजक मुखी, ब्रम्हज्ञान प्रचारक प. आ. मोहन गुंडुजी यांचे अध्यात्मावर आधारित विचार भाविकांना श्रवण करता येणार आहे.
तरी या सत्संग कार्यक्रमाला कोकणच्या विविध भागांतून मानव धर्मप्रेमीनी उपस्थित राहून सत्संगचा आनंद प्राप्त करावा, असे आवाहन डॉ. जगदीश तांदळे यांनी केले आहे.