दाओसमधील आर्थिक परिषदेत महाराष्ट्रासोबत विदेशी गुंतवणुकीचे ३ लाख ५३ हजार कोटींचे करार
दावोस : येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात झाली असून या वर्षी ३ लाख ५३ हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उपस्थितीत झाले.
या करारांमुळे राज्यात जवळपास २ लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी असलेल्या पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इको सिस्टिम आहे. जेम्स आणि ज्वेलरी, माहिती तंत्रज्ञान, हरित हायड्रोजन, हरित ऊर्जा, पेपर आणि पल्प, खार उद्योग, डेटा सेंटर, इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये गुंतवणूक केली आहे.
अमेरिका, स्वित्झर्लंड, सिंगापूर, दक्षिण कोरीया या देशांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यूएई,ओमान या देशांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास पसंती दर्शवली आहे. आर्सेअर मित्तल, जिंदल, गोदरेज, अदानी या कंपन्यांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे