उद्योग जगतमहाराष्ट्रलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर

२४ व २५ फेब्रुवारी रोजी कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळावा

बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची सूवर्णसंधी

विविध कंपन्यांनी रिक्त पदांची माहिती द्यावी तर बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी करावी : अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे

ठाणे, दि.15 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये कोकण विभागस्तरीय “नमो महारोजगार” मेळाव्याचे आयोजन दि.24 व 25 फेब्रुवारी रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा, ठाणे (पश्चिम) येथे करण्यात येणार आहे. हा रोजगार मेळावा महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे.

या माध्यमातून 1 लाख 50 हजार युवक/युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागातील अन्य जिल्ह्यातील कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती प्रशासनास द्यावी तर नोकरी/रोजगार इच्छुक बेरोजगार युवक-युवतींनी आपली नोंदणी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी आज येथे केले.
“नमो महारोजगार मेळावा” संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक आज दि.15 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांच्यासह उमेद च्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे, कामगार उपायुक्त श्री.प्रदीप पवार, समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, कार्यकारी अभियंता सा.बां. (विद्युत) संजय पुजारी, महानगरपालिकांचे अधिकारी, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी हे प्रत्यक्ष तर इतर जिल्ह्यातील निवासी उपजिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी श्रीमती जायभाये-धुळे यांनी या आढावा बैठकीत विभागनिहाय आढावा घेताना उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, जवळपास एक लाख पन्नास हजार रोजगार देण्याच्या माध्यमातून सर्वांना एक चांगले काम करण्याची संधी मिळाली आहे. यासाठी सर्वांनी मिळून जास्तीत जास्त कंपन्यांकडून त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. त्याची नोंदणी करावी तसेच जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण-तरुणींपर्यंत या “नमो महारोजगार” मेळाव्याची माहिती पोहोचवावी. त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी. हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधितांनी झोकून देऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी व रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे तसेच उमेदवार नोंदणी व रिक्त पदांसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या साळुंखे त्यांनी केले आहे.
“नमो महारोजगार” मेळाव्याकरिता दि.14 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 4.45 वाजेपर्यंत कंपन्या/आस्थापनांकडून पोर्टलद्वारे 48 हजार 797 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी/महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी/व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना त्यांनी विविध कंपन्यांशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : Konkan Railway | चिपळूण-पनवेल, पनवेल-रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेन ४ फेब्रुवारीपासून

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button