१ जूनपर्यंत सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस ठाण्यापर्यंतच धावणार!
रत्नागिरी : मध्य रेल्वेकडून मुंबईत घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे सावंतवाडी ते दादर दरम्यान धावणारी तुतारी एक्सप्रेस दिनांक 27 मे ते एक जून 2024 या कालावधीत दादर ऐवजी ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे.
मुंबईत मध्य रेल्वेच्या हद्दीत विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. या कारणामुळे कोकणातून जाणाऱ्या विविध गाड्यांचे मुंबईत प्रवास संपण्याचे ठिकाण तसेच मुंबईतून प्रवास सुरू होण्याचे ठिकाण यामध्ये काही दिवसांपूर्वीच बदल जाहीर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरून मुंबईत जाणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकातच संपवण्यात येत आहे.
या बदलामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन पनवेल ऐवजी सावंतवाडी रोड ते दादरपर्यंत रोज धावणारी तुतारी एक्सप्रेस (11004) ठाणे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
याबाबत रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 मे रोजी प्रवास सुरू होणाऱ्या आणि मुंबईत 28 मे रोजी पोचणाऱ्या फेरीपासून ते दि. 1 जून 2024 च्या फेरीपर्यंत सावंतवाडी रोड ते दादर तुतारी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.