महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षण
जासई हायस्कूलची कु. मानसी पाटील हिचा सन्मान

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : नवी मुंबई पुनर्वसन विकास समितीमार्फत दि.बा. पाटील स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये लेख स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मानसी पाटील हिचा तिसरा क्रमांक आलेला आहे.तीला प्रमाणपत्र, ट्रॉफी व बक्षिसाची रोख रक्कम अकरा हजार रुपये प्रदान करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नुरा शेख, लेखनिक श्री. ठाकूर, श्रीम. मुंगाजी आणि विद्यार्थी उपस्थित होते.