ब्रेकिंग न्यूज
‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ झाले महाराष्ट्राचे राज्यगीत!
मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १९ फेब्रुवारीपासून २०२३ हे गीत अंगिकारण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.