रत्नागिरीच्या नव्या बसस्थाकात एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्ध ठार

रत्नागिरी ः एसटी बसची समोरुन धडक बसून बसच्या मागील चाकांखाली सापडून गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 13 मे रोजी दुपारी 11.30 वा. सुमारास रविवारी उद्घाटन झालेल्या येथील नव्या एसटी बस स्थानकात घडली.
या प्रकरणी एसटी चालक बापू कोंड्या आखाडे (55,रा.जाकादेवी,रत्नागिरी) विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलाकर बाबाजी चव्हाण (82, रा. जुवे चव्हाणवाडी, रत्नागिरी) असे एसटीच्या चाकाखाली सापडून मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी त्यांचे वडील कमलाकर चव्हाण हे मेडीकल शॉपमधून गोळ्या घेउन घरी जाण्यासाठी एसटी स्टॅन्डमध्ये जात होते. त्यावेळी जयस्तंभ ते एसटी स्टॅन्ड येणार्या भरधाव एसटीने (एमएच-14-बीटी-2757) एसटीडेपो बाहेरच कमलाकर चव्हाण यांना समोरुन ठोकर दिली. एसटीच्या जोरदार धडकेमुळे कमलाकर चव्हाण खाली पडले व एसटीच्या मागील चाकांखाली आले. एसटीची मागील त्यांच्या दोन्ही चाके पायांवरुन गेल्याने ते गंभीर जखमी झाले. आजुबाजूच्या नागरिकांनी त्यांना त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारांदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास पोेलिस हेड काँस्टेबल हरचकर करत आहेत.