श्री रत्नागिरीच्या राजाचे आगमन गणेशभक्तांचा उत्साह शिगेला!

रत्नागिरी : ‘श्री रत्नागिरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन रविवारी (३ ऑगस्ट) संध्याकाळी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं. ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने रत्नागिरी शहर दुमदुमून गेलं होतं.

टीआरपी ते मारुती मंदिर सर्कलपर्यंत करण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीत हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. टीआरपी पेट्रोल पंपावरून सायंकाळी 5 वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री 10 वाजेपर्यंत मारुती मंदिरापाशी संपली. यावेळी तरुणाईचा जोश आणि भक्तिभाव पाहण्यासारखा होता.
खालील लिंकवर व्हिडिओ पहा 👇👇
https://www.facebook.com/share/r/1CEgo7SCqD/
यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार मानले. रत्नागिरीच्या राजाचं हे दिमाखदार आगमन पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांनी गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार मानले. रत्नागिरीच्या राजाचं हे दिमाखदार आगमन पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.