Konkan Railway | रत्नागिरी, सावंतवाडीपर्यंत होळीसाठी आणखी चार गाड्या
रत्नागिरी : होळीसाठी मुंबईकर चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी, रत्नागिरी ते पनवेल, पनवेल ते सावंतवाडी तसेच रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या आणखी एकूण चार विशेष गाड्या रेल्वे कडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष :
शिमगोत्सवासाठी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये १) गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी स्पेशल मुंबई सीएसएमटी येथून ०४/०३/२०२३ आणि ०७/०३/२०२३ रोजी ०:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 09.00 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी स्पेशल रत्नागिरी येथून ०६/०३/२०२३ रोजी ०६:३० वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 13:50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबेल.
गाडीच्या डब्यांची रचना : एकूण 20 कोच = स्लीपर – 18 कोच, SLR – 02.
२) गाडी क्र. ०११५४ / ०११५३ रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी विशेष :
ही गाडी क्र. 01154 रत्नागिरी – पनवेल स्पेशल रत्नागिरी येथून 04/03/2023 आणि 07/03/2023 रोजी 10:00 वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी 16:20 वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडी क्र. 01153 पनवेल – रत्नागिरी स्पेशल पनवेल येथून 05/03/2023 आणि 08/03/2023 रोजी 18:20 वाजता सुटेल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी 00:20 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबणार आहे.
रचना : एकूण 20 कोच = स्लीपर – 18 कोच, SLR – 02.
3) ट्रेन क्र. 01155 / 01156 पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल विशेष :
गाडी क्र. 01155 पनवेल – सावंतवाडी रोड स्पेशल पनवेल येथून 04/03/2023 आणि 07/03/2023 रोजी 18:20 वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे 04:10 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01156 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 05/03/2023 आणि 08/03/2023 रोजी 07:45 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 17:20 वाजता पनवेलला पोहोचेल.
ही गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल.
रचना : एकूण 20 कोच = स्लीपर – 18 कोच, SLR – 02.
4) गाडी क्र. ०११५८ रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) विशेष :
गाडी क्र. 01158 रत्नागिरी – लोकमान्य टिळक (टी) विशेष गाडी रत्नागिरी येथून 09/03/2023 रोजी 06:30 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 13:30 वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.
रचना : एकूण 20 कोच = स्लीपर – 18 कोच, SLR – 02.