इंग्लंडची कंपनी रत्नागिरीत करणार १०० कोटींची गुंतवणूक!
इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी चार्जिंग प्रकल्प सुरू करणार
मुंबई : इंग्लडची अँपरजिया (Ampergia) कंपनी आणि ओंपेगच्या (Ompeg) शिष्टमंडळासमवेत मुंबई येथे राज्याच्या उद्योग मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनुसार रत्नागिरी शंभर कोटींची गुंतवणूक करणारा इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्रकल्प लवकरच रत्नागिरी येऊ घातला आहे
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच इंग्लंडमधील अँपरजिया कंपनी तसेच ओंपेग या कंपनीसोबत मुंबईत बुधवारी बैठक झाली. यावेळी कंपन्यांच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या समजोत्यानुसार रत्नागिरीत सुमारे 100 कोटींची गुंतवणूक करणारा EV चार्जिंग प्रकल्प येणार आहे. यावेळी कंपनीचे संचालक संदीप साळी, अभिजित देशपांडे व आशुतोष देशपांडे उपस्थित होते.
रत्नागिरीच्या विकासाला चालना देणारा ई व्हेईकल कारखाना लवकरच सुरू केला जाणार असल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री असलेल्या ना. उदय सामंत यांनी मंगळवारी त्यांच्या रत्नागिरी दौऱ्या दरम्यान दिली होती. यासाठी तालुक्यातील प्रस्तावित जागा सर्वेक्षणासाठी संबंधित उद्योजक रत्नागिरीत दाखल देखील झाले आहेत. या उद्योजकांना सोबत घेऊन प्रशासनाकडून जागा निश्चित करण्याचे काम सुरू आहे. याचबरोबर रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसात नाईट लँडिंगची सुविधा निर्माण केली जाणार असल्याची माहिती देखील जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती.
रत्नागिरी तालुक्यातल ई व्हेईकल कारखाना उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्या दृष्टीने हा प्रकल्प उभारण्याला गती आली असून संबंधित कारखान्याची टीम रत्नागिरी तालुक्यात जागा निश्चित करण्यासाठी दाखल देखील झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यासाठीची जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी दिली होती.
मुंबई इंग्लंडच्या कंपनीसोबत झालेल्या समजोत्यानुसार काळाची गरज बनलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी चार्जिंग प्रकल्प सुरू होत असल्याने रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी देखील हा प्रकल्प हातभार लावणार असल्यामुळे रत्नागिरीकरांसाठी ही खुशखबर आहे.