उद्योग जगतब्रेकिंग न्यूज
यूपीआय व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ

दिल्ली : डिसेंबर महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे एकाच महिन्यात जवळपास 16.73 अब्ज आर्थिक व्यवहार झाले. UPI द्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये सुमारे 23.25 लाख कोटी रुपयांची रक्कम प्रक्रिया झाली
यूपीआय व्यवहारांसंदर्भात NPCI ने म्हटले आहे की, व्यवहारांच्या संख्येमध्ये 39 टक्के वार्षिक वाढ झाली असून व्यवहाराच्या रकमेतील वार्षिक वाढ 28 टक्के आहे. तसेच, मागील महिन्यात सरासरी दैनंदिन व्यवहारांची रक्कम 74 हजार 990 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले.