राज्यभरातील जिल्हा उद्योग परिषदांमधून ९६ हजार कोटींचे MOU

मुंबई : राज्यभरात घेण्यात आलेल्या जिल्हा उद्योग परिषदांमधून 96 हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथे ” राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजक होणार” आयोजित ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषद – २०२५ या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी उद्योग मंत्री म्हणाले की, गेली दोन वर्षे ज्या पद्धतीने दावोस येथे जाऊन आम्ही रेड कार्पेट देतो, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये देखील रेड कार्पेट देतो. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही उद्योग परिषद घेतली आणि त्या जिल्हा उद्योग परिषदांमधून ९६ हजार कोटी रुपयांचे MOU झाले.
जो उद्योजक आपल्या जिल्ह्यात उद्योग करतो आहे, त्यानेच ही ९६ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केली.
यावर्षी १ लाख २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या माध्यमातून मराठी उद्योजक कुठेही मागे नाही हे आम्ही सिद्ध केले आहे.
-डॉ. उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.
उद्योगमंत्री म्हणून दावोसवरून महाराष्ट्रात आल्यानंतर, तिकडे होणाऱ्या MOU मध्ये मराठी उद्योजकांचा सहभाग आहे का? याचा शोध आम्ही घेतो, असे ते म्हणाले.
भविष्यात दावोसमध्ये देखील मराठी उद्योजकांचे MOU झाले पाहिजेत – या प्रेरणेनेच आपण काम केले पाहिजे असं सांगितलं
या प्रसंगी मा. मंत्री मंगलप्रभात लोढा, शिवसेना जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, आशिष मराठे, राजेंद्र सावंत, राजश्री पाटील, संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.