मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या स्थानकावरून धावणार!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण १२ स्थानकांची नावे समोर आली आहेत.
मुंबई ते अहमदाबाद हा ५०८ किलोमीटर लांबीचा हा प्रवास महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा- नगर हवेलीमधून केला जाईल. या बुलेट ट्रेनचा रूट मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सपासून सुरू होतो तर अहमदाबादमधील साबरमती येथे शेवटचं स्टेशन आहे. यादरम्यान हि बुलेट ट्रेन ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा , सुरत ,भरूच आणि वडोदरा येथे थांबणार आहे.
विरार: पालघर जिल्ह्यात असलेल्या विरारमधून बुलेट ट्रेन जाईल. हे महाराष्ट्रातील तिसरे स्टेशन असेल.
बोईसर: विरार यानंतर पुढचे स्टेशन (Mumbai Ahmedabad Bullet Train) असेल ते म्हणजे बोईसर.
वापी: वापी गुजरातमधील पहिले स्टेशन, वापी हे एक महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे.
बिलीमोरा: नवसारी जिल्ह्यातील या स्टेशन मुळे पर्यटनाला चालना मिळेल.
सुरत: सुरत हे गुजरातमधील एक प्रमुख व्यावसायिक शहर असून याठिकाणी बुलेट ट्रेनसाठी महत्वाचा थांबा असेल.