महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
गणेशोत्सव आता अधिकृतपणे घोषित झाला महाराष्ट्र राज्योत्सव!

मुंबई : गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या सार्वजनिकतेच्या रूपातून साजरा होणारा गणेशोत्सव, आता अधिकृतपणे राज्योत्सव म्हणून मान्यताप्राप्त झाला आहे.
राष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला साजेसा हा निर्णय सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानसभेत जाहीर केला.
मूल्ये, संस्कृती व परंपरा जपण्याचा व वृद्धिंगत करण्याचा हे पाऊल आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार तसेच, ॲड. आशिष शेलार जी यांच्या या निर्णयाचे स्वागत करतो.
-डॉ. उदय सामंत, मराठी भाषा विभाग मंत्री.