Konkan Railway | दसऱ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर दोन विशेष गाड्या जाहीर

कारवार : दसरा सण 2024 साठी प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे
दसऱ्यासाठी रेल्वे कडून जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांचा तपशील तपशील पुढीलप्रमाणे आहेत.
- ट्रेन क्र. 06569 / 06570 यशवंतपूर – कारवार – म्हैसूर जंक्शन एक्सप्रेस विशेष :
ट्रेन क्र. 06569 यशवंतपूर – कारवार एक्सप्रेस विशेष गाडी यशवंतपूर स्थानकातून 11/10/2024 रोजी 00:30 वाजता सुटेल आणि कारवार स्थानकात ती त्याच दिवशी 16:15 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 06570 कारवार – म्हैसूर जंक्शन एक्सप्रेस विशेष कारवार स्थानकातून 11/10/2024 रोजी 23:30 वाजता सुटेल. ट्रेन म्हैसूर जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी 16:40 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 06569 खालील स्थानकांवर थांबेल: कुनिगल, चन्नरायपटना, हसन, सकलेशपूर, सुब्रमण्य रोड, कबकापुत्तूर, बंटवाल, सुरथकल, मुळकी, उडुपी, बारकूर, कुंडापूर, मूकांबिका रोड बिंदूर (H), भटकल, मुरुडेश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड आणि अंकोल.
ट्रेन क्र. 06570 वर नमूद केलेल्या सर्व स्थानकांवर थांबेल आणि यशवंतपूर, KSR बंगळुरू सिटी जंक्शन आणि मांड्या येथे अतिरिक्त थांबा असेल.
रचना : एकूण 18 डबे = 2 टियर एसी – 02 डबे, 3 टियर एसी – 02 डबे, स्लीपर – 06 डबे, जनरल – 06 डबे, एसएलआर – 02 डबे.
- ट्रेन क्र. 06585 / 06586 म्हैसूर जंक्शन – कारवार – म्हैसूर जंक्शन एक्सप्रेस विशेष:
ट्रेन क्र. 06585 म्हैसूर – कारवार एक्सप्रेस विशेष म्हैसूर स्थानकातून 12/10/2024 रोजी 21:20 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 16:15 वाजता कारवार स्थानकात पोहोचेल.
ट्रेन क्र. 06586 कारवार – म्हैसूर जंक्शन एक्सप्रेस विशेष 13/10/2024 रोजी 23:30 वाजता कारवार स्थानकातून सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 16:40 वाजता म्हैसूर जंक्शनला पोहोचेल.
ही ट्रेन मांड्या, KSR बंगळुरू सिटी जंक्शन, यशवंतपूर, कुनिगल, चन्नरायपटना, हसन, सकलेशपूर, सुब्रमण्य रोड, कबकापुत्तूर, बंटवाल, सुरथकल, मुळकी, उडुपी, बारकूर, कुंडापूर, मूकांबिका रोड बिंदूर (H), भटकल, मुरुडेश्वर, होन्नावर, कुमटा, गोकर्ण रोड आणि अंकोल येथे थांबेल.
रचना : एकूण 18 डबे = 2 टियर एसी – 02 डबे, 3 टियर एसी – 02 डबे, स्लीपर – 06 डबे, जनरल – 06 डबे, एसएलआर – 02 डबे.