ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांना ‘लोटिस्मा’चा आदर्श शिक्षक श्रीकांत गोवंडे साहित्य पुरस्कार प्रदान
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2025/01/IMG-20250131-WA0005-780x470.jpg)
- मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त लोटिस्मा’, को.म.सा.प. व म.सा.प.तर्फे विविध उपक्रम संपन्न
चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने आदर्श शिक्षक श्रीकांत गोवंडे यांच्या स्मरणात दिला जाणारा ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार येथील ज्येष्ठ लेखिका स्मिता देवधर यांना चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देवधर यांनी ५६ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचा उत्सव सर्वत्र साजरा होत असताना तिचे महत्व पटावे, जनजागृती व्हावा, तिचा प्रसार नी त्याबाबत प्रचार योग्य उपक्रमातून पार पडावा यासाठी शासकीय स्तरावरुन मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश आले त्यांची अंमलबजावणी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय चिपळूण, कोकण मराठी साहित्य परिषदआणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भाषा संवर्धन करिता काही उपक्रम आणि सन्मान घेण्यात आले, त्यातील एक उपक्रम खुल्या गटात स्वरचित काव्य वाचन स्पर्धा आणि दुसरी पुस्तकं परिक्षण मला आवडलेले पुस्तक विषयी थोडक्यांत परिक्षण परिचय या दोन्हीही स्पर्धांना उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांचे ऊत्तम परिक्ष कवी शाहिर प्रदीप मोहिते, शिवाजी शिंदे आणि कवी लेखक रविंद्र गुरव यांनी केले.
सर्वप्रथम गोवंडे सरांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रतीमेस पुष्पहार उपस्थीत मान्यवर यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. गोवंडे सरांच्या कार्याची केतकरसरांनी तर स्मिता देवधर यांचा परिचय मनिषा दामले यांनी करून दिला. या कार्यक्रमाला, लोटिसमाचे समन्वय इतिहास अभ्यासक व मराठी भाषा समितीचे सदस्य प्रकाश देशपांडे, चिपळूण को म सा प अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे, कै. गोवंडे सरांच्या परिवारातील श्री व सौ मनीष चितळे, जिल्हा प्रतिनिधी कवी राष्ट्रपाल सावंत, माजी अध्यक्ष बोली भाषा अभ्यासक कवी अरूण इंगवले, म. सा. प चे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, लोटिस्मा कार्यवाह विनायक ओक, संचालक सुनिल खेडेकर, मधुसूदन केतकर, चिपलूण मधील साहित्य प्रेमी सर्व स्पर्धक परिक्षक उपस्थित होते. काव्य स्पर्धेत प्रथम मेधा लोवलेकर, द्वितीय विद्या तांबे, तृतीय पल्लवी भावे तर उत्तेजनार्थ अपर्णा नातू, नेहा सोमण, पूनम बुरटे, मला आवडलेले पुस्तकपरिचय मध्ये प्रथम विशाखा चितळे, द्वितिय मेधा लोवलेकर, तृतीय संगीता जोशी,उत्तेजनार्थ अपर्णा नातू,प्रकाश उनकले, वीणा गोगटे यांना सन्मानपत्र रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोटिसमा वाचनालय, को. म. सा. प. तसेच म. सा. प. आजी माजी कार्यकारणी अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे प्रा. संतोष गोनबरे, प्रा. अंजली बर्वे, प्राची जोशी, कवी अरूण इंगवले, राष्ट्रपाल सावंत सर्वांनी मिळून विशेष परिश्रम घेतले. स्वागत, सूत्रसंचलन मनीषा दामले यांनी आणि आभार विनायक ओक यांनी मानले.