महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
रत्नागिरी कोकणनगर येथे इज्तिमा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरीच्या वतीने ख्वाजा गरीब नवाज अजमेर यांच्या उर्स निमित्त रत्नागिरी कोकणनगर मदरसा फैजाने अत्तार येथे इज्तिमा चे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने या सहभाग घेतला.
या वेळी प्रवचन (बयान) हाजी शब्बीर साहब यांनी केले, तसेच इज्तिमानंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले. या वेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेस जरीवाला, अली असगर अत्तारी, अकील मेमन आदी यावेळी उपस्थित होते.