लोकल न्यूज

धामणी ग्रामस्थांचा शिवराज्याभिषेक दिनी स्तुत्य उपक्रम ; महामार्गावर लोकसहभागातून उभारली प्रवासी शेड

संगमेश्वर दि. ६ : गेले कांही वर्षे मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचे काम चालू आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी काम झाले आहे, तर काही ठिकाणी खूप अपूर्णच असल्याने रस्त्याला अद्याप प्रवाशांसाठी निवारा शेड उभारण्यात आलेल्या नाहीत,त्यामुळे प्रत्येक थांब्यावर ऊन व पावसात गाडी येइपर्यंत शाळा,काॅलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध तसेच इतर प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्यामुळे ऊन व पावसाचा रोज त्रास होत आहे. हा त्रास ओळखून धामणी येथील कांही मंडळींनी एकत्र येऊन चर्चा करून आपणही काहीतरी समाजाचे देणं लागतो.किंवा आपले ते कर्तव्य समजून अशा लहान लहान गोष्टी आपण करण्याचा जरूर प्रयत्न करूया अशा विचाराने पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक तात्पुरती शेड उभारण्याचा एका स्तुत्य उपक्रमाचा निर्णय हाती घेतला.

धामणी बस थांब्यावर दोन्ही बाजूला “बस थांब्याचे” फलक नव्हते,या करीता दोन्ही बाजूला डिजीटल ” बस थाबा” फलक लावण्यात आले. तसेच जास्त वर्दळ किंवा रहदारी संगमेश्वरच्या भागाकडे असल्याने त्या रस्त्याच्या बाजूला बांबू,प्लॅस्टिक वापरून छप्पर करून व बाजूने पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून त्याही बाजू बंद केल्या. त्या नंतर आत बसण्यासाठी तात्पुरते कडप्पा ठेवून बाकडी तयार केली.व साधारणपणे वीस बाय पंधराची शेड तयार झाली.व पुढे दर्शनी भागाला डिजिटल ” प्रवासी निवारा शेड”असा फलक लावण्यात आला.

ही प्रवासी मार्ग निवारा शेड आज छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रवाशांना उपलब्ध करून दिली.या समाज सेवेसाठी रामदेव सेल्स धामणी, प्रकाश घाणेकर, अजित कोळवणकर, सिद्धेश खातू,,अमोल गुरव,स्वपनील सर्वे , प्रथमेश घाणेकर, प्रणव कोळवणकर,निनाद प्रसादे,ओमकार देवरूखकर, प्रतिक घाणेकर, इत्यादी मंडळींनी योगदान देऊन समाजात एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. या आदर्श समाज कामासाठी व प्रवाशांसाठी झालेल्या सोयी बद्दल अनेक प्रवाशी वर्गाने कौतुक करून धन्यवाद दिले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button