ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
कडवई रेल्वे स्थानकानजीक ट्रॅकवर तरुणीचा मृतदेह

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावरील कडवई रेल्वे स्टेशननजीक राजवाडी गावाच्या जवळ तेथील रेल्वे फाटकामध्ये दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास साक्षी अनिल भडवळकर (वय वर्ष १८ ) हिचा मृतदेह आढळला.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संगमेश्वर पोलिस स्टेशनचे किशोर जोयशी, चंद्रकांत कांबळे, सोमनाथ आव्हाड, मुगदळ आणि कडवई धामनाक वाडितील ग्रामस्थ पंचनानम्यावेळी उपस्थित होते.