अबिटगांव येथे “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” उत्साहात साजरा

- अबिटगांव – कृषिकन्यांतर्फे “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” उत्साहात साजरा
चिपळूण ,अबिटगांव २३ जुलै :देशाच्या कृषी परंपरेचे, जैवविविधतेचे आणि संस्कृतीचे मूळ घटक असलेल्या शुद्ध देशी गोवंशाच्या जतन आणि संवर्धनासाठी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन ” आज राज्यभरात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब सावंत कोकण कृषीविद्यापीठ दापोली अंतर्गत तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविदयालय येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांनी गोमातेची पूजा केली व देशी गाईंच्या संवर्धनासाठीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले.
या कार्यक्रमात देशी गाईंचे महत्त्व सांगताना विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना पटवून दिले की देशी गाई म्हणजे केवळ दूध देणारे प्राणी नाहीत तर त्या आपल्या शेतीचे, पर्यावरणाचे आणि आरोग्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या शेणामध्ये जीवाणूनाशक गुणधर्म आहेत व गोमूत्र हे सेंद्रिय शेतीसाठी अमूल्य आहे.
देशी गोवंशाच्या विविध जातींचे (जसे की गीर, साहीवाल, लाल सिंधी, कोकण गवळाव, देवनी, खिल्लार इ.) महत्त्व विषद केले. अशाप्रकारे विद्यार्थिनींनी स्थानिक शेतकऱ्यांना देशी गाई पालनाचे फायदे समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमासाठीचे मार्गदर्शन हे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रशांत इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमिषा कोळी, वृषाली गोफणे, दीक्षा खांडेकर ,साक्षी अवतार , सृष्टी काळे, प्रज्ञा गोठणकर ,साक्षी गुरव, मयुरी ढेकळे , प्रीती पेरवी ,मृणाल उपाध्ये या कृषी कन्यांचे सहकार्य लाभले.