ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयलोकल न्यूज

हवाई सुंदरी मैथिली पाटील हिच्या कुटुंबियांचे महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन

उरण दि १३ (विठ्ठल ममताबादे ) : अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील रहिवासी व हवाई सुंदरी असलेली  मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
विमान दुर्घटनेत मैथिलीच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली. न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून महेंद्रशेठ घरत यांनाही तीव्र दुःख झाले. सांत्वन करताना ते म्हणाले, “गुरुवारी विमान अपघाताची घडलेली घटना अतिशय वेदनादायक आहे. न्हावा गावची कन्या या दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरलीय. मीसुद्धा ही घटना समजताच अस्वस्थ आणि दुःखी आहे. काॅंग्रेसचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता, पण तो या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रद्द केला आहे. जगभर मी प्रवास करतो, पण अशी घटना कधी घडली नाही. केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घ्यावी. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या मागे मी कायम आहे.”
यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र म्हात्रे उपस्थित होते. त्यांच्या चुलत भाचीची ती मुलगी आहे. यावेळी न्हावा गावच्या माता-भगिनीही उपस्थित होत्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button