आंगणेवाडीला अभिप्रेत विकास लवकरच प्रत्यक्षात : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

मालवण : आंगणेवाडी धार्मिक स्थळी आंगणेवाडीवासीयांना अभिप्रेत असलेला विकास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी माता उत्सवाच्या निमित्ताने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले आणि भविष्यात कोणावरही संकट येऊ नये यासाठी देवी चरणी प्रार्थना केली.

यासोबतच, आंगणे कुटुंबीयांनी मांडलेल्या विकासात्मक मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आंगणे कुटुंबीयांना अभिप्रेत असलेला विकास लवकरच प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्न केले जातील असं वक्तव्य केलं. यावेळी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे वाटप देखील करण्यात आले.
या प्रसंगी आमदार नीलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने आलेले भाविक उपस्थित होते.