आंगवली येथील मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तूचा १३ जानेवारीला कलशारोहण सोहळा
देवरूख (सुरेश सप्रे) : आंगवली गावातील श्री मार्लेश्वर मंदिराच्या भव्य वास्तुचा कलशारोहण, व उद्घाटन सोहळा दि. १३ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने दि. १२ ते १४ जानेवारी या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १२ जानेवारीला सकाळी ७.२० वाजता ध्वजारोहण, सकाळी ८ वाजता वास्तूशांत होणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप येईल. दुपारी ३.३० ते ६ या वेळेत सोमेश्वर मंदिर ते गलेश्वर मंदिर या मार्गावर देवदेवतांची मिरवणूक काढण्यात येईल. ७.०० वाजता दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ‘कोकण साज-संगमेश्वरी बाज’ हा करमणुकीचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे .
दि. १३ जानेवारीला सकाळी ८ वाजता प्राणप्रतिष्ठापना, वरद शंकराची पूजा होईल. दुपारी १२.२० वाजता कलशारोहण सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कल्याणपूर्व हळदी समारंभ होणार आहे. सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत उद्घाटन, स्मरणिका प्रकाशन, स्वागत समारंभ होणार आहे.
दि. १४ जानेवारीला श्री मार्लेश्वर कल्याण विधीशी निगडीत दिंड्या, पालख्यांचे आगमन होऊन कल्याणपूर्व विधीला सुरूवात होईल. मध्यरात्री १२ वाजता श्री मार्लेश्वरच्या शिखराकडे सर्व पालख्या प्रयाण करतील. यानिमित्त सलग तीन दिवस आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली, व ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.
सर्व धार्मिक कार्यक्रम आंगवली येथील श्री मार्लेश्वर देव मंदीरात होणार आहेत.