महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीत स्टेट, बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे भाविकांना फराळ वाटप

रत्नागिरी : आषाढी एकादशीनिमित्त आपली सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखत भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी वर्गातर्फे वारकरी आणि भक्तगणांसाठी येथील श्री विठ्ठल मंदिर येथे उत्स्फूर्तपणे फराळाचे वाटप करण्यात आले.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात स्टेट बँकचे
जयेश जिलठे, विनायक कुराडे, सौरभ सागसकर, श्रीया लिमये, शकुंतला काळुखे, अनुप्रिता बिर्जे, उषा पवार, तृप्ती गायकवाड तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सागर नाईक व कर्मचारी यांचा सहभाग होता.
आघाडीच्या दोन बँकांनी राबवलेल्या या उपक्रमाबाबत विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी कृतज्ञता व्यक्त केली.