महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
‘इस्कॉन’ रत्नागिरीचा आज साप्ताहिक सत्संग कार्यक्रम
रत्नागिरी : ‘इस्कॉन’ रत्नागिरी मार्फत विशेष रविवार सत्संग कार्यक्रम रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे :
सायंकाळी ७. ०० ते ७.३० – कीर्तन , गौर आरती, ७.३० ते ८.३० – प्रवचन – श्रीमान निमाई चांद प्रभुजींद्वारे, रात्री ८. ३० ते ८.४५ -कीर्तन ८.४५ ०० ते ९.३०- महाप्रसाद.
हा सत्संग आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ, रत्नागिरी विस्तार केंद्र, माधव सभागृह, साळवी स्टॉप, रत्नागिरी- ४१५६३९ येथे संपन्न होणार आहे.
तरी रत्नागिरी येथील सर्व भक्तांनी व जनतेने मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रम समन्वय समिती
इस्कॉन रत्नागिरी विस्तार केंद्र यांच्यामार्फत करण्यात आले आहे.