उमरे शाळा क्र. १ चा अमृत महोत्सव साजरा
संगमेश्वर (सुरेश सप्रे ) : तालुक्यातील जि, प, मराठी शाळा उमरे नं
. १ या शाळेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सर्व ग्रामस्थांनी व माजीविद्यार्थ्यांनी यांचे सहकार्यातून दि. 24
व 25 डिसेंबर रोजी शाळेचा अमृत महोत्सव जोरदारपणे साजरा केला.
यावेळी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, माजी विद्यार्थी ग्रामस्थ
बहुसंख्येने उपस्थित होते.
24 रोजी शोभायात्रेने कार्यक्रमाची सुरुवात झाली .यावेळी आजाी- माजी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले अशा पारंपारिक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच महिलांनीही यावेळी पारंपारिक वेशभूषा केली.
यानंतर विविध विषयावर मार्गदर्शनपर परिसंवाद आयोजित केले त्यात शेती व व्यवसाय कसा करावा यावर मिलिंद कडवईकर यांनी मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरण व महिला बचत गटाची व्याप्ती वाढविणेसाठी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन, फनी गेम्स घेण्यात आले.
रात्री विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक २५ रोजी मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायबर क्राईम अंतर्गत संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक झावरे यांचे मार्गदर्शन ,माजी विद्यार्थी मेळावा, गुणवंत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ,स्नेहभोजन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि .प रत्नागिरीचे माजी अध्यक्ष रोहन बने, सौ.रचना महाडिक संतोष थेराडे गटशिक्षणअधिकारी प्रदीप पाटील विविध संघटनांचे पदाधिकारी माजी शिक्षक, पंचक्रोशीतील सर्व मान्यवर,व माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या स्थापनेच्या पहिल्या बॅच मधील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तसेच 75 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांसह पदवी प्राप्त व शाळेस सहकार्य करणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा, माहेरवाशीण महिला यांचा सत्कार करण्यात आला. अमृत महोत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, सरपंच सौ सायली मोहिते, उपसरपंच प्रभाकर जाधव, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष महेंद्र जाधव, तिनही वाडीचे अध्यक्ष सूर्यकांत बसवणकर, संतोष मोहिते,चंद्रकांत बाईत, कोषाध्यक्ष भिवाजी बसवणकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.ऋतुजा बडद, माजी सरपंच प्रदीप बसवणकर,नंदकुमार घाग, बंडू बसवणकर ,मुंबई मंडळाचे व स्थानिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी विद्यार्थी दिनेश बाईत व त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारलेल्या मिठाचा सत्याग्रह व संविधान निर्मिती देखाव्याचे व शाळेने केलेल्या सुशोभनाचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले तसेच शाळेच्या प्रगती बाबत, शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम व नवोदय परीक्षेत यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले .माजी शिक्षकांनी यावेळी शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उदय जाधव यांनी शाळेत एक अँड्रॉइड टीव्ही, सुरेश मोहिते यांनी विज्ञान साहित्य व पुस्तके तर आत्माराम बाईत व राजेंद्र बडद यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. अमृत महोत्सव कमिटीने व शाळा व्यवस्थापन समितीने या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने केले. किरण जाधव यांनी दोन दिवसाच्या स्नेह भोजनाचा संपूर्ण खर्च स्वतः केला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी देणगी रूपाने सहकार्य केले. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक महाडिक व कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.